अखेर जीएसटी जम्मू-काश्मीरमध्येही मंजूर, उद्यापासून अंमलबजावणी

By admin | Published: July 5, 2017 10:11 PM2017-07-05T22:11:04+5:302017-07-05T22:21:45+5:30

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आहे. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाली नव्ह्ती पण...

GST finally approved in Jammu and Kashmir, implementation from tomorrow | अखेर जीएसटी जम्मू-काश्मीरमध्येही मंजूर, उद्यापासून अंमलबजावणी

अखेर जीएसटी जम्मू-काश्मीरमध्येही मंजूर, उद्यापासून अंमलबजावणी

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - देशभरात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आहे. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाली नव्ह्ती पण आता जम्मू-काश्मीरमध्येही जीएसटी बिल मंजूर झालं आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठ्या गोंधळानंतर जीएसटी बिल मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्येही  इतर राज्यांप्रमाणे 6 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होईल.
 
जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटीसाठी मंगळवारपासून चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुस-या दिवशी जीएसटी मंजूर होण्यापूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नॅशनल कॉन्फ्रन्स, काँग्रेस आणि अपक्ष आमदारांच्या विरोधामुळे गोंधळ निर्माण झाला. गोंधळातच पीडीपी आणि भाजप सरकारला जीएसटी बिल मंजूर करुन घेण्यात यश आलं.
(पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीला विरोध, व्यापा-यांवर लाठीचार्ज)
(जीएसटीबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं)
 (एक नाही देशात तीन "जीएसटी")
1 जुलैपासून देशभरात ‘एक देश एक कर’  यानुसार जीएसटी करप्रणाली लागू झाली . मात्र जम्मू-काश्मीरमध्ये ही करप्रणाली लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे जीएसटी कर प्रणाली लागू न झालेलं जम्मू-काश्मीर हे एकमेव राज्य होतं. संविधानातील कलम 370 नुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. जम्मू-काश्मीरचं स्वतःचं संविधान असल्यामुळे केवळ राज्य सरकारलाच कर वसूली करण्याचा अधिकार आहे. या व्यवस्थेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये संविधानातील 101 व्या दुरुस्तीला लागू करता येत नाही. आता जीएसटीला मंजुरी मिळाल्यामुळे त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि 6 जुलैपासून जीएसटी प्रणाली लागू होईल.

Web Title: GST finally approved in Jammu and Kashmir, implementation from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.