GST देशाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणारा चौथा ऐतिहासिक सोहळा
By admin | Published: June 30, 2017 02:20 PM2017-06-30T14:20:38+5:302017-06-30T14:20:38+5:30
जीएसटीचे लाँचिंग संसदेच्या ज्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्या सेंट्रल हॉलला एक ऐतिहासिक महत्व आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - जीएसटीचे लाँचिंग संसदेच्या ज्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्या सेंट्रल हॉलला एक ऐतिहासिक महत्व आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात चौथ्यांदा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री दिमाखदार कार्यक्रम होईल. त्यानंतर उद्यापासून देशभरात सर्वत्र जीएसटी लागू होईल. एक देश, एक कर या दिशेने टाकण्यात आलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
- पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर याच सेंट्रल हॉलमध्ये ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्तेचे हस्तांतरण केले होते.
- देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 ऑगस्ट 1972 च्या मध्यरात्री संसेदच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी वीवी गिरी देशाचे राष्ट्रपती होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
- देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 ऑगस्ट 1997 च्या मध्यरात्रीही संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम झाला होता. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते. केआर नारायणन देशाचे राष्ट्रपती होते.
- भारतीय संविधानाची निर्मितीही याच सेंट्रल हॉलमध्ये झाली आहे.
- स्वातंत्र्य मिळण्याआधी खासदारांसाठी ग्रंथालय म्हणून सेंट्रल हॉलचा वापर करण्यात यायचा.
- लोकसभेच्या निवडणुकीनंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमधून अधिवेशनाला सुरुवात होते.
- दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला राष्ट्रपती याच सेंट्रल हॉलमध्ये संसेदच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात. त्यानंतर अधिवेशन सुरु होते.
- काही प्रसंगी दुस-या देशाचे प्रमुख याच सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संसदेच्या सदस्यांना संबोधित करतात.
- सेंट्रल हॉलच्या भिंतीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर ओसवाल्द बीरले यांनी काढलेले चित्र आहे.
- मदन मोहन मालवीय, दादाभाई नौरोजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, मोतीलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह भारताच्या स्वातंत्र्य लढयात योगदान देणा-या अनेकांची चित्रे आहेत.