जीएसटी उदघाटन समारंभ LIVE : राष्ट्रपतींचे भाषण सुरू

By Admin | Published: June 30, 2017 11:02 PM2017-06-30T23:02:59+5:302017-06-30T23:53:02+5:30

स्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या उदघाटन समारंभासाठी संसद भवन सज्ज झाले आहे. या समारंभासाठी

GST inauguration ceremony LIVE: The President's speech started | जीएसटी उदघाटन समारंभ LIVE : राष्ट्रपतींचे भाषण सुरू

जीएसटी उदघाटन समारंभ LIVE : राष्ट्रपतींचे भाषण सुरू

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या उदघाटन समारंभासाठी संसद भवन सज्ज झाले आहे. या समारंभासाठी  वित्तमंत्री अरुण जेटली लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हामिद अंसारी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या ऐतिहासिक कर सुधारणेसाठी शुक्रवारी मध्यरात्री संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. मात्र काँग्रेस, तृणमूल, समाजवादी, डावे पक्ष, द्रमुक इत्यादी प्रमुख विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार

जीएसटी LIVE

 

- जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे 14 वर्षांचा प्रवास आपल्या शेवटच्या यशस्वी मुक्कामाला पोहोचेल - राष्ट्रपती 

- मोदींचे भाषण संपले, राष्ट्रपतींच्या भाषणास सुरुवात 

जीएसटी गुड अँड सिंपल टॅक्स - मोदी

- नव्या व्यवजीएसटी नव्या भारतातील करव्यवस्था आहे, जीएसटी डीजिटल इंडियांमधील करव्यवस्था आहेे, जीएसटी ही आर्थिक सुधारणेचे प्रतीक - मोदीस्थेबाबत अनेक शंका कुशंका जाहीर केल्या जात आहेत, पण चष्म्याचा नंबर बदलल्यावर जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास होईल, मग सारे सुरळीत होईल - मोदी 

- जीएसटीमुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांना होणारा त्रास संपुष्टात येईल 

स्वातंत्रावेळी वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांच्या विलिनीकरणातून देशाचे भौगोलिक एकीकरण केले होते, आज जीएसटीच्या माध्यमातून देशाचे आर्थिक एकीकरण झाले आहे - मोदी

गीतेप्रमाणेच जीएसटी कौन्सिलचेही 18 बैठकांमधून 18 आध्याय पूर्ण झाले, हा दूर्मीळ योगायोग - मोदी

जीएसटीचा आराखडा ठरवण्यासाठी मेहनत करणाऱ्या जीएसटी कौन्सिलचे आभार - मोदी

 जीएसटी लागू करताना गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे - मोदी

14 ऑगस्ट 1947 रोजी येथूनच स्वातंत्र्याची घोषणा झाली होती - मोदी

या ऐतिहासिक क्षणांच्या सुरुवातीसाठी संसदेच्या सेंट्रल हॉलपेक्षा अधिक योग्य जागा दुसरी नाही - मोदी

 - आज आपण देशाच्या पुढील वाटचालीची सुरुवात करण्याच्या दिशेने जात आहोत - मोदी

-  आज मध्यरात्री 125 कोटी देशवासीय या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होतील - मोदी

 - जीएसटी हे एका सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम नाही तर सर्वाच्या मेहनतीचे फळ - मोदी

- जेटलींचे भाषण संपले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणसार सुरुवात 

 - जीएसटीमुळे भ्रष्टाचार आणि करचोरीला लगाम लागेल - जेटली 

- जीएसटीतून मिळणारे अधिकचे उत्पन्न देशातील गरिबांच्या हितासाठी वापरता येतील - जेटली 

- सध्या देशात असलेल्या करांपेक्षा अधिक बोजा पडू नये यासाठी खबरदारी घेतली - जेटली  

- जीएसटीबाबतचे सर्व निर्णय एकमताने झाले - जेटली

- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जीएसटीच्या प्रवासाचे साक्षीदार - जेटली 

- असिम दासगुप्ता यांच्याकडून मला मिळाले जीएसटीबाबतचे प्राथमिक शिक्षण - जेटली

-जीएसटीमुळे देशात एक टॅक्स, एक देश आणि एक बाजार होईल - जेटली

-15 वर्षांपूर्वी झाली होती जीएसटीला लागू करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात - जेटली

- सहकार्य करणाऱ्या सर्वाचे जेटलींनी मानले आभार

- उदघाटन समारंभामध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणास सुरुवात

- राष्ट्रगीताची धून वाजवून जीएसटीच्या उदघाटन सोहळ्यास सुरुवात 

Web Title: GST inauguration ceremony LIVE: The President's speech started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.