जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- नरेंद्र मोदी

By admin | Published: August 8, 2016 06:12 PM2016-08-08T18:12:45+5:302016-08-08T18:33:07+5:30

जीएसटी मंजूर झाल्यानं टॅक्स टेररिझमपासून मुक्ती मिळाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली

GST means freedom from tax terrorism - Narendra Modi | जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- नरेंद्र मोदी

जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- नरेंद्र मोदी

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- भाजप सरकारचं बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत सर्वपक्षीयांचे आभार मानले आहेत. जीएसटी मंजूर झाल्यानं टॅक्स टेररिझमपासून मुक्ती मिळाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.

जीएसटी मंजूर होणं म्हणजे भारतातल्या लोकशाहीचा विजय झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. जीएसटी म्हणजे केवळ करव्यवस्था नसून एक भारत या भावनेला बळ देणारी व्यवस्था आहे. जीएसटी म्हणजे एका पक्षाचा नाही तर हा लोकशाहीचा विजय आहे. दोन्ही सभागृहांनी खूप विचारमंथन करून जीएसटीला इथपर्यंत आणलं आहे आणि लवकरात लवकर ते मंजूर करून कर रचना सुधारण्यास मदत केल्याचं मत यावेळी नरेंद्र मोदींनी मांडलं आहे.

जीएसटीमुळे सर्व प्रकारचे छुपे कर रद्द होतील. टॅक्स क्रेडिटचा प्रवाहही सरळ सोपा राहील. याचा या क्षेत्राला लाभच होईल. जीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्याचा आपला प्रयत्न आहे. जीएसटी विधेयकाचा ग्राहकांना ख-या अर्थानं फायदा होणार असून, ग्राहक खरा राजा होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा ग्राहकाला होणार आहे. जीएसटीमुळे देशातली अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासही मदत होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-GST म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती 
- जीएसटीमुळे व्यवस्थेत एक पारदर्शकता येणार आहे
-जीएसटीमुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागाला विकासात बरोबर आणणं सोपं होणार 
-जीएसटीमुळे व्यवस्थेत एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल
-गरिबांसाठी असलेल्या योजना जीएसटीच्या बाहेर असतील
-जीएसटीमुळे गरिबी दूर होण्यास मदत होणार 
-जीएसटीमुळे बँकांच्या व्यवहारातही पारदर्शकता येणार आहे
-जीएसटीमुळे टेक्नॉलॉजीला बळ मिळणार आहे
 -जीएसटीमुळे टॅक्स चोरीच्या प्रकारांना आळा बसणार आहे
-जीएसटीमुळे काळा पैसा साठवता येणार नाही
-जीएसटी भ्रष्टाचाराला शून्यावर घेऊन जाणार
-जीएसटीमुळे टॅक्स पेअर, टॅक्स कलेक्टर यांच्यामध्ये समन्वय साधला जाणार 
-राज्यांनी जीएसटी विधेयकाला मंजुरी देणं गरजेचं

Web Title: GST means freedom from tax terrorism - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.