'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना GST कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:13 PM2023-02-26T12:13:04+5:302023-02-26T12:18:12+5:30

अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

gst officer dies of heart attack while playing cricket match in ahmedabad gujarat | 'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना GST कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू; झालं असं काही...

फोटो - आजतक

googlenewsNext

गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बॉलिंग करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आणि तो जमिनीवर कोसळला. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजकोट- सुरतमध्ये क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता अशीच एक घटना अहमदाबादमध्ये शनिवारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये जीएसटी कर्मचारी आणि सुरेंद्रनगर जिल्हा पंचायत यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात जीएसटी कर्मचारी वसंत राठोड यांनीही सहभाग घेतला होता. बॉलिंग करताना वसंत यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी अशाप्रकारे क्रिकेट खेळताना दोघांचा मृत्यू झाला होता. क्रिकेटच्या मैदानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची ही तिसरी घटना आहे.

राजकोटमध्ये गेल्या 20 दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने चार तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातच्या सुरतमध्येही एका तरुणाच्या मृत्यूची घटना समोर आली होती. क्रिकेट खेळून हा तरुण घरी परतला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या तरुणाचे नाव प्रशांत असे होते. 19 फेब्रुवारीला राजकोटमध्ये क्रिकेट खेळत असताना एका तरुणाला हार्ट अ‍टॅक आल्याने मृत्यू झाला आहे. रेस कोर्स मैदानात क्रिकेट खेळताना जिग्नेश चौहान याने 30 रन्स बनविले होते. आऊट झाल्यानंतर तो खुर्चीवर बसला होता, यावेळी त्याला अचानक झटका आला. 

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. जिग्नेश चौहान याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यानंतर त्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. जिग्नेशला दोन वर्षांची मुलगीही आहे. काही दिवसांपूर्वी सुरतचा रहिवासी प्रशांत कांतीभाई भरोलिया क्रिकेट सामना खेळून घरी परतला होता. घरी आल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान प्रशांतचा मृत्यू झाला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: gst officer dies of heart attack while playing cricket match in ahmedabad gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.