पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सर्वसामान्यांची होणार सुटका?, धर्मेंद्र प्रधानांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 12:30 PM2018-05-25T12:30:24+5:302018-05-25T13:08:35+5:30
पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली - गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. इंधन दरवाढीपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होऊ शकते. दरवाढ कमी करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून कार्य सुरू आहे, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत यावेळी प्रधान यांनी दिले आहेत.
(Fuel Price Hike: इंधन दरवाढीची परिस्थिती टाळता येणार नाही- नितीन गडकरी)
गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेचा रोष वाढत चालल्याचं पाहून मोदी सरकारही हादरलंय. डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. हे तापलेलं वातावरण पाहून, या परिस्थितीतून लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान दिलं आहे. त्यामुळे आता कोणता कर किती प्रमाणात कमी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
जीएसटीचा मार्ग - प्रधान
प्रधान म्हणालेत की, या परिस्थितीतून मार्ग निघेल, याचा मला संपूर्ण विश्वास आहे. ज्याद्वारे मध्यम वर्गीय व सर्वसामान्यांना इंधर दरवाढीतून सुटका मिळेल. यासाठी सरकारचं आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरदेखील नजर असून यातून काही-न्-काही मार्ग नक्की काढण्यात येईल.
या समस्येसाठी तत्कालीन, दीर्घकालीन उपायांसंबंधी विचारविनिमय सुरू आहेत. शिवाय, इंधन दरवाढ कमी करण्यासाठी जीएसटीदेखील एक उपाय आहे, असेही प्रधान म्हणालेत.