जीएसटी दर अखेर निश्चित, किमान 5 तर कमाल 28 टक्के

By admin | Published: November 3, 2016 05:47 PM2016-11-03T17:47:58+5:302016-11-03T17:47:58+5:30

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत जीएसटी दर निश्चितीबाबत अखेर एकमत झाले. यानुसार किमान 5% आणि कमाल कमाल 28% दर निश्चित करण्यात आला आहे.

The GST rates are fixed at the end, at least 5 or at most 28 percent | जीएसटी दर अखेर निश्चित, किमान 5 तर कमाल 28 टक्के

जीएसटी दर अखेर निश्चित, किमान 5 तर कमाल 28 टक्के

Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत जीएसटी दर निश्चितीबाबत अखेर एकमत झाले. यानुसार किमान  5% आणि कमाल  कमाल 28% दर निश्चित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी याबाबत माहिती दिली. निश्चित करण्यात आलेल्या या दरांना आता संसदेकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे.   
आजच्या बैठकीत जीएसटीसाठी  5 %,  12%, 18% आणि 28% या दरांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सामान्य माणसाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अन्नधान्यावर कोणताही दर निश्चित करण्यात आलेला नाही.
यापुर्वी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील करांची मर्यादा किमान 6 टक्क्यांपासून कमाल 26 टक्के इतकी ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

Web Title: The GST rates are fixed at the end, at least 5 or at most 28 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.