GST: वस्तूच्या जुन्या व नव्या किंमती जाहिरातीद्वारे कळवा
By admin | Published: July 4, 2017 06:23 PM2017-07-04T18:23:25+5:302017-07-04T18:23:25+5:30
जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणं गरजेचं असणार आहे असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणं गरजेचं असणार आहे असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं. जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे स्पष्ट केलं.
वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये जीएसटीनंतर बदल होईल, त्याबाबत उत्पादकांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यावी. वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश असतो त्यावर पुन्हा जीएसटी स्लॅबप्रमाणे कर लावला तर ती वस्तू आणखी महाग होईल. त्यामुळे व्यापारी वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री करु शकतात, असंही सरकारने स्पष्ट केलं.
वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे सांगताना देशात15 विभागांच्या सचिवांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. जी प्रत्येक स्तरावर देखरेख करत आहे. शिवाय जिल्हापातळीवरही 175 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे 4-5 जिल्ह्यांची जबाबदारी असेल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली.
Manufacturers have to give an advt in newspaper about change of price & revised price to be displayed alongside old price: Revenue Secy #GSTpic.twitter.com/yuZwd2QPHN
— ANI (@ANI_news) July 4, 2017