GSTचा तिढा सुटणार? मोदींचे सोनिया गांधी, मनमोहन सिंगना चर्चेचे निमंत्रण
By admin | Published: November 27, 2015 10:54 AM2015-11-27T10:54:48+5:302015-11-27T13:41:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून जीएसटी विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून त्यादरम्यान बहुचर्चित जीएसटी ( वस्तू व सेवाकर) विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर ही भेट होणार आहे.
काँग्रेस जीएसटी विधेयकाचा पुरस्कार करतं, पण विधेयकातील काही मुद्यांवर सरकारनने विरोधकांशी चर्चा करण्याची गर आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारनेच हे विधेयक पहिल्यांदा संसदेत मांडले होते आणि भाजपानने त्याला तीन वर्ष विरोध केला होता. या विधेयकात दोन-तीन सुधारणा व्हाव्यात एवढीच आमची मागणी आहे. देशासाठी योग्य व लाभदायी ठरेल असे विधेयक आम्हाला हवे आहे, असे मत राहुल गांधी यांनी मांडले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी राहुल यांचे म्हणणे मान्य करीत काँग्रेसच्या तिनही वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित केल्याचे समजत आहे.