जीएसटीला अखेर मिळणार मुहुर्त; बुधवारी राज्यसभेत

By admin | Published: August 2, 2016 06:17 AM2016-08-02T06:17:20+5:302016-08-02T06:17:20+5:30

पंतप्रधानांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळी जीएसटी विधेयक सभागृहात मतदानासाठी मांडण्यात येईल.

GST will finally get a boost; In the Rajya Sabha on Wednesday | जीएसटीला अखेर मिळणार मुहुर्त; बुधवारी राज्यसभेत

जीएसटीला अखेर मिळणार मुहुर्त; बुधवारी राज्यसभेत

Next


नवी दिल्ली : राज्यसभेतील २४४ सदस्य आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळी जीएसटी विधेयक सभागृहात मतदानासाठी मांडण्यात येईल. नवज्योतसिंग सिद्धू यांची जागा रिक्त आहे, तर सुभाष चंद्रा हे आज शपथ घेणार आहेत. यांच्याशिवाय अन्य सदस्य या मतदानात सहभाग घेतील.
राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या सध्या २४४ आहे. अरुण जेटली, अनंत कुमार, एस. एस. अहलुवालिया, मुख्तार अब्बास नक्वी आणि अन्य नेते प्रत्येक राज्यसभा सदस्यांच्या संपर्कात आहेत. जेणेकरून या सदस्यांनी सभागृहात हजर राहावे.
रेखाशिवाय अन्य सर्व सदस्यांशी संपर्क झाला आहे आणि सभागृहात उपस्थित राहण्यास त्यांनी सहमती दिली आहे, तर अण्णाद्रमुकवगळता अन्य पक्षांनी जीएसटीच्या बाजूने मतदान करण्यास सहमती दर्शविली आहे. जीएसटी विधेयकावर मतैक्य होण्यासाठी मोदी यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना निर्देश दिले आहेत. तथापि, जयललिता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा पक्ष विधेयकाला विरोध करू शकतो. त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू
आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>विवादाचे निवारण :
वादाच्या मुद्यावर काही सुधारणा करण्यासाठी सरकारची तयारी आहे. केंद्र आणि राज्यात कराबाबत जे वाद आहेत त्याबाबतचे अधिकार जीएसटी परिषदेला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. प्रस्तावित विधेयकात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात.
>विधेयक बुधवारी, आज नव्हे !
सोनिया गांधी या मंगळवारी वाराणसीत आहेत. त्यामुळे हे विधेयक बुधवारी मांडण्यात यावे, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी अरुण जेटली यांना सांगितले. त्यानंतर जेटली यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि बुधवारी हे विधेयक सादर करण्याचे निश्चित झाले.
>चिदंबरम देणार माहिती : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे बुधवारी सकाळी काँग्रेसच्या सदस्यांना जीएसटीबाबत माहिती देतील. अर्थात उपनेते आनंद शर्मा यांच्याऐवजी चिदंबरम हे नेतृत्व करतील.

Web Title: GST will finally get a boost; In the Rajya Sabha on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.