गेस्ट हाऊसच्या गच्चीत कम्प्युटर बाबांचे होम हवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:40 AM2018-04-12T03:40:59+5:302018-04-12T03:40:59+5:30
मध्य प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी पाच बाबा, महाराजांना राज्यमंत्रिपद बहाल केले होते. यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीकाही झाली होती.
भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी पाच बाबा, महाराजांना राज्यमंत्रिपद बहाल केले होते. यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीकाही झाली होती. त्यातील कम्प्युटर बाबांनी बुधवारी सकाळी सरकारी विश्रामगृहाच्या गच्चीवर होम-हवन केले आहे. हे विधी करताना कम्प्युटर बाबांनी त्यांच्या डोक्यावरच यज्ञाचा कलश धरला होते. यज्ञ कलशातून धूर निघत असतानाच बाबा स्मार्टफोनवर बोलत असल्याचे फोटो प्रसारमाध्यमातून दिवसभर फिरत होते. विधानसभा निवडुका डोळ््यासमोर ठेवत भाजप सरकारने हिंदूंच्या मतांसाठी या बाबा-महाराजांनी मंत्री पदे दिल्याची टीका काँग्रेसने केली होती. आता कम्प्युटर बाबांनी सरकारी इमारतीत केलेल्या हवन विधीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. (वृत्तसंस्था)