निवृत्तीवेतनधारकांच्या मेळाव्यात विविध विषयांवर मार्गदर्शन
By admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:16+5:302016-02-07T22:46:16+5:30
जळगाव : जिल्हा कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणार्या निवृत्तीवेतनधारकांचा त्रैमासिक मेळावा अल्पबचत भवन येथे नुकताच झाला. यामेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास जिल्हा कोषागार अधिकारी एस. बी. नाईकवाडे, अप्पर कोषागार अधिकारी एल. रायसिंग, पी. बी. भावसार, जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जामखेडकर , निवृत्तीवेतन शाखेतील कर्मचारी तसेच संपूर्ण जिल्हयातून 53 निवृत्तीधारक, कुटूंबनिवृत्तीवेतन धारक उपस्थित होते. यावेळी मासिक निवृत्तीवेतन , कुटूंब निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयाकडून मे २०१५ महिन्यापासून मासिक निवृत्तीवेतन हे नियमित महिन्याच्या एक तारखेला सी. एम.पी. व्दारे थेट खात्यात जमा करणे, महागाई भत्ता जानेवारी ते सप्टेंबर २०१५ च्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तवेतनधारकांना फरकाची रक्कम अदा करणे, चालू महिन्यापर्यंत हयातीचे
Next
ज गाव : जिल्हा कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणार्या निवृत्तीवेतनधारकांचा त्रैमासिक मेळावा अल्पबचत भवन येथे नुकताच झाला. यामेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास जिल्हा कोषागार अधिकारी एस. बी. नाईकवाडे, अप्पर कोषागार अधिकारी एल. रायसिंग, पी. बी. भावसार, जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जामखेडकर , निवृत्तीवेतन शाखेतील कर्मचारी तसेच संपूर्ण जिल्हयातून 53 निवृत्तीधारक, कुटूंबनिवृत्तीवेतन धारक उपस्थित होते. यावेळी मासिक निवृत्तीवेतन , कुटूंब निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयाकडून मे २०१५ महिन्यापासून मासिक निवृत्तीवेतन हे नियमित महिन्याच्या एक तारखेला सी. एम.पी. व्दारे थेट खात्यात जमा करणे, महागाई भत्ता जानेवारी ते सप्टेंबर २०१५ च्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तवेतनधारकांना फरकाची रक्कम अदा करणे, चालू महिन्यापर्यंत हयातीचे दाखले प्राप्त झालेल्यांचे मागील व चालू महिन्याचे निवृत्तीवेतन जमा करणे, सेवानिवृत्ती व कुटूंब निवृत्तीवेतनधाकराचे जीवनप्रमाणपत्र सादर करणे, अंशराशीकरण, सुधारीत ओळख पडताळणी प्रक्रिया, तसेच निवृत्तीवेतन धारक , कुटूंब निवृत्तीधारक मयत झाल्यास त्वरीत माहिती देणे, ना हरकत दाखला, विमा छत्र योजना, आयकर दराबाबत मार्गदर्शनात करण्यात आले. जिल्ात चित्ररथाव्दारे ९ पासून प्रबोधन जळगाव - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभर चित्रररथाद्वारे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम कलापथकांमार्फत सादर होतील. ९ रोजी पारोळा येथे चित्ररथाचे आगमन होणार आहे. १० व ११ रोजी अमळनेर १२ रोजी धरणगाव, १३ व १४ रोजी चोपडा, . १५ रोजी यावल, १६ व १७ रोजी मुक्ताईनगर, १८ रोजी बोदवड, १९ व २० रोजी भुसावळ, २१ रोजी जामनेर, २२ व २३ रोजी जळगाव, २४ रोजी एरंडोल, २५ रोजी पाचोरा, २६ रोजी पाचोरा, २७ रोजी भडगाव, २८ व २९ रोजी चाळीसगाव येथे हा चित्ररथ व कलावंतांचे पथक जाऊन कार्यक्रम सादर करतील. सकाळी ८ ते सायंकाळी ७ पयंर्त या कार्यक्रमांत पथनाट्य, गायन, लोककला सादरीकरण, भारुड, शाहीरी, गवळण, प्रबोधनात्मक व्याख्यान, पोवाडा, नाटक अशा विविध कलाप्रकारांचा समावेश आहे. नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी केले आहे.