गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपानंतर १४ धक्के; काश्मीरलाही धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:19 AM2020-06-16T03:19:11+5:302020-06-16T03:19:22+5:30
गुजरातमध्ये रविवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छच्या भचाउपासून १० किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये
अहमदाबाद : गुजरातच्या कच्छमध्ये रविवारी ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर सोमवारी कच्छ जिल्ह्यात १४ धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. तथापि, जम्मू आणि काश्मीरला सोमवारी पहाटे ४.३६ वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची नोंद रिश्टर स्केलवर ३.२ एवढी झाली.
गुजरातमध्ये रविवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छच्या भचाउपासून १० किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता. गांधीनगर स्थित भूकंपविज्ञान संशोधन संस्थेच्या (आयएसआर) वैज्ञानिकांनी सांगितले की, भूकंपानंतर १४ धक्के जाणवले. यात सोमवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी झालेला ४.६ तीव्रतेच्या भूकंपाचाही समावेश आहे. याचा केंद्रबिंदू भचाउपासून १५ किमी दूर उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता.
आयएसआरचे वैज्ञानिक संतोषकुमार यांनी सांगितले की, आम्ही याचे विश्लेषण करत आहोत की, हा भूकंपानंतरचा धक्का होता की, नवा भूकंप होता.
आयएसआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४.६ तीव्रतेच्या भूकंपाशिवाय सकाळी १० वाजून ०२ मिनिटांनी ३.७ तीव्रतेचा भूकंपानंतरचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदूही भचाउपासून सहा किमी अंतरावर उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता.
रविवारी रात्री १ वाजून ०१ मिनिटांनी ३.६ तीव्रतेचा भूकंपानंतरचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भचाउपासून ११ किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता. अधिकाºयांनी सांगितले की, ३.१, २.९,२.५,२.४,१.७,१.६ तीव्रतेचे झटके दुपारपर्यंत जाणवले.