गुजरात आपचे प्रमुख गोपाल इटालिया यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 04:04 PM2022-10-13T16:04:29+5:302022-10-13T16:06:12+5:30
आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. एनसीडब्ल्यूने त्यांना आज दिल्लीत चौकशीसाठी बोलवले होते. यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गोपाल इटालिया चर्चेत आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या होत्या. दरम्यान, त्यांचा आक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टीप्पणी करत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओत ते महिलां संदर्भातही आक्षेपार्ह बोलत असल्याचे दिसत आहे.
JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार मोठी भरती, जाणून घ्या, माहिती
गोपाल इटालिया हे गुजरात मधील पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते याअगोदरही वादामध्ये सापडले होते. ते सध्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे काम करत आहेत. आम आदमी पक्षाने गुजरात मधील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.