अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 01:34 PM2022-09-14T13:34:44+5:302022-09-14T13:35:18+5:30
गुजरात युनिव्हर्सिटीजवळ पासपोर्ट ऑफिसकडे ही इमारत असल्याचं म्हटलं जात आहे.
गुजरातमधीलअहमदाबाद येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली. यामध्ये सात मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही लिफ्ट कशी खाली कोसळली याची माहिती समोर आलेली नाही. गुजरात युनिव्हर्सिटीजवळ पासपोर्ट ऑफिसकडे ही इमारत असल्याचं म्हटलं जात आहे.
ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली त्याचं नाव एम्पायर-२ असल्याचं म्हटलं जातंय. समोर आलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट अचानक खाली कोसळली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मजूरांना बाहेर काढलं. या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलं होतं.
Seven labourers dead in a lift collapse incident reported in Ahemdabad, Gujarat: Chief Fire Officer, Jayesh Khadia
— ANI (@ANI) September 14, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सात मजूरांचा मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या मजुराची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. जखमी मजुरावर सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.