गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 09:24 AM2021-11-18T09:24:51+5:302021-11-18T09:26:00+5:30

गुजरातच्या द्वारकामध्ये एटीएसची मोठी कारवाई; तिघांना अटक

Gujarat Anti Terrorist Squad nabs 3 with heroin worth Rs 120 crore | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई

गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई

googlenewsNext

अहमदाबाद: गुजरातमधील द्वारकामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. द्वारकामधील नवाद्रा गावात एका घरातून २४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारातील किंमत १२० कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसनं तिघांना ताब्यात घेतलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसनं १२० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचं बाजारमूल्य जवळपास ६०० कोटी रुपये इतकं होतं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या हाती आज आणखी एक यश लागलं. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत जात असल्याचा दावा एटीएसनं केला.

पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगात असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर तुरुंगातूनच अमली पदार्थांचं रॅकेट चालवत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचं एटीएसनं सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून जवळपास १२० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एटीएसनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली. 

Web Title: Gujarat Anti Terrorist Squad nabs 3 with heroin worth Rs 120 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.