Gujarat Assembly Election: पायी चालत मतदान केंद्रावर पोहोचले पंतप्रधान मोदी! मतदानानंतर मानले जनतेचे आभार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:09 AM2022-12-05T11:09:40+5:302022-12-05T11:10:48+5:30
महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्रावर मोदी रांगेत उभे राहिले आणि त्यांनी आपला क्रमांक आल्यानतंर, मतदान केले.
गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी अहमदाबादच्या राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. यापूर्वी ते राजभवनातून मतदान केंद्राकडे निघाले. मतदान केंद्राकडे जात असताना मोदींनी शाळेच्या वाटेवर उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन केले. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्रावर मोदी रांगेत उभे राहिले आणि त्यांनी आपला क्रमांक आल्यानतंर, मतदान केले.
मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील जनतेने लोकशाहीचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला. मी देशातील जनतेचे आभार मानतो. निवडणूक प्रक्रिया शांततेत पारपडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी आज त्यांचे बंधू सोमाभाई यांना भेटायलाही जाणार आहेत.
Ahmedabad, Gujarat | Prime Minister Narendra Modi greets people on his way to Nishan Public school, Ranip to cast his vote for Gujarat Assembly elections.#GujaratElectionspic.twitter.com/vndeh2DWAX
— ANI (@ANI) December 5, 2022
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ८ वाजता सुरू झाले, जे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. ट्विटमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले आहे, "मी गुजरातमधील जनतेला, विशेषत: महिला आणि तरुणांना दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याची विनंती करतो. मी सकाळी ९ वाजता मतदान करणार आहे."
#WATCH | The festival of democracy has been celebrated with great pomp by the people of Gujarat, Himachal Pradesh and Delhi. I want to thank people of the country. I also want to congratulate Election Commission for conducting elections peacefully: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/2KKjCq7W1D
— ANI (@ANI) December 5, 2022
याच बरोबर, गृह मंत्री अमित शाहदेखील आज अहमदाबादमध्ये मतदान करतील. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. निवडणूक निकालाची घोषणा 8 डिसेंबरला होणार आहे.