Gujarat Assembly Election: ...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:57 PM2022-10-30T14:57:22+5:302022-10-30T15:02:47+5:30

अरविंद केजरीवाल यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे.

Gujarat Assembly Election | Arvind Kejriwal | Enforce uniform civil Code in the country; Arvind Kejriwal's demand | Gujarat Assembly Election: ...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

Gujarat Assembly Election: ...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

Next

भावनगर: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election) भाजपसह (BJP) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टी (AAP) जोरदार प्रचार करत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) गुजरातमध्ये विविध ठिकाणी सभा-रॅलीच्या माध्यमातून भाजपवर टीका करत आहेत. दरम्यान, काल म्हणजेच शनिवारी भावनगरमध्ये बोलताना त्यांनी समान नागरी कायद्यावरुन भाजपवर निशाणा साधला.

भावनगरमध्ये बोलताना केजरीवाल म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे हेतू अतिशय वाईट आहेत. भाजपचे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सरकर आहे. पण, ते त्या राज्यात समान नागरी कायदा(Uniform Civil Code) लागू करत नाहीत. निवडणुकीनंतर गुजरातची समितीही आपापल्या घरी निघून जाईल. यावेळी केजरीवालांनी समान नागरी कायद्याचे समर्थन (Uniform Civil Code) करत संविधानातील तरतुदीनुसार, देशभर हा कायदा लागू करण्याची मागणी केली.

दरम्यान, गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी हा भाजपचा मास्टर स्टॉक मानला जात आहे. गुजरात सरकारने शनिवारी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. शनिवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समिती स्थापनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याचे मानले जात आहे. पुढील आठवड्यात राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Gujarat Assembly Election | Arvind Kejriwal | Enforce uniform civil Code in the country; Arvind Kejriwal's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.