Gujarat Assembly Elections: पहिल्या टप्प्यात एकूण ६० टक्के मतदान, गेल्या वेळेपेक्षा कमी व्होटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:32 PM2022-12-01T21:32:21+5:302022-12-01T21:42:41+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये सुमारे 60.20 टक्के मतदान झाले. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 2017 च्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये सुमारे 60.20 टक्के मतदान झाले. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 2017 च्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे. 2017 च्या निवडणुकीत या 89 जागांवर 68 टक्के मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. 2017 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या 89 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या.
89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. गुजरातमधील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे सौराष्ट्र विभागातील द्वारका जिल्ह्यातील खंभलिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सुरतमधील कटारगाममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यासोबतच जामनगर (उत्तर) येथेही मतदान झाले, या मतदार संघातून क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा रिंगणात आहेत. गृहमंत्री हर्ष संघवी, पूर्णेश मोदी आणि भावनगरचे पाच वेळा आमदार राहिलेले पुरुषोत्तम सोळंकी यांचा समावेश आहे.
कुठल्या मतदार संघा्त किती मतदान?
मरेली - 57.06%, भरूच - 63.08%, भावनगर - 57.81%, बोताड - 57.15%, डांग - 64.84%, द्वारका - 59.11%, गीर सोमनाथ - 60.46%, जामनगर - 56.09%, जुनागढ - 56% - 56%, - 56% - 57% - 56% - 56% - 57% कुच्छबी, 66.62% पोरबंदर - 53.84% राजकोट - 57.68% सुरत - 60.01% सुरेंद्रनगर - 60.71% तापी - 72.32% वलसाड - 65.29%.
गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा आज शांततेत पार पडला असला, तरी नवसारीत मतदानापूर्वी भाजपच्या उमेदवारावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. वांसदा विधानसभेतील भाजपचे उमेदवार पियुष पटेल यांच्या वाहनावर लोकांनी हल्ला केला. यादरम्यान पियुष पटेल यांच्या डोक्याला दुखापत झाली.या हल्ल्यात पियुष पटेल यांच्या गाडीचेही नुकसान झाले. काँग्रेसचे उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, गृहमंत्री हर्ष संघवी, दिवंगत नेते अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल, आप नेते गोपाल इटालिया, रवींद्र जडेजा आदींनीही आपापल्या बूथवर मतदान केले.