Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:12 PM2022-09-12T21:12:52+5:302022-09-12T21:13:28+5:30
गुजरातच्या एका ऑटो ड्रायव्हरने केजरीवालांना रात्री जेवण्याचे आमंत्रण दिले, पण पोलिसांनी केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले.
अहमदाबाद: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावत आहे. आज केजरीवाल यांनी दिवसभर ऑटो चालकांशी संवाद साधला, यादरम्यान एका ऑटोचालकाने त्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. केजरीवालांनी विनंती मान्य करत रात्री आठची वेळ निश्चित केली. मात्र गुजरात पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ऑटोमध्ये जाण्यापासून रोखले.
ગુજરાતની જનતા એટલે જ દુઃખી છે કેમ કે ભાજપના નેતાઓ જનતાની વચ્ચે નથી જતા અને અમે જનતાની વચ્ચે જઈએ છે તો તમે રોકો છો - CM @ArvindKejriwal
— AAP Gujarat । Mission2022 (@AAPGujarat) September 12, 2022
પ્રોટોકોલ તો એક બહાનું છે... હકીકતમાં કેજરીવાલને સામાન્ય જનતાની વચ્ચે જતા રોકવાનું છે pic.twitter.com/CqFXbWGlf0
भाजप घाबरला आहे- सिसोदिया
पोलिसांनी रोखल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपचे लोक जनतेच्या नेत्याला लोकांमध्ये जाण्यापासून रोखत आहेत. अरविंद केजरीवाल जनतेत जाण्याची भाजपला भीती आहे,' असे सिसोदिया म्हणाले. दुसरीकडे, दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करत केजरीवालांवर हल्ला चढवला आहे. 'गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना विशेष संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. केजरीवाल यांच्यावर हिंसक हल्ला होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. केजरीवाल यांच्याकडे 32 सरकारी वाहने आहेत. असा तमाशा करणे लज्जास्पद आहे,' अशी टीका मिश्रा यांनी केली.
आज अहमदाबाद के एक ऑटो ड्राइवर भाई ने बहुत प्यार से अपने घर शाम को खाने पर बुलाया है। मैं ज़रूर जाऊँगा। pic.twitter.com/cK7KlKN8wZ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 12, 2022
चालकांशी संवाद साधताना ऑटोचालक विक्रम ललतानी यांनी केजरीवाल यांना सांगितले की, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मी सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये तुम्ही पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी जेवायला गेला होता. माझ्या घरी पण जेवायला याल का? यावर केजरीवाल यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की, पंजाब आणि इथेही ऑटोवाले मला आवडतात. तुम्ही आठ वाजता माझ्या हॉटेलवर या, आम्ही तुमच्यासोबत ऑटोने तुमच्या घरी जाऊ. या दरम्यान ललतानीने आनंदाने मान हलवली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव गुजरात पोलिसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ऑटोमध्ये जाऊ दिले नाही.
केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
आज अरवीद केजरीवालांनी 'फ्री कल्चर'वरुन भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझ्यावर फ्री कल्चरचा आरोप केला जातो. मात्र सर्वांना मोफत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आरोप करणारे आपल्या मुलांना परदेशात शिकवतात आणि आम्ही दिलेल्या मोफत शिक्षणावर प्रश्न उपस्थित करतात. त्यांना मतदान करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही त्यांना मत दिले तर तुमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. गुजरातमध्ये 'आप'चे सरकार आल्यास चांगले आणि मोफत उपचार मिळतील. वीज फुकट दिली जाईल, 18 वर्षांवरील मुलींना दरमहा 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी आश्वासने यावेळी केजरीवालांनी दिली.