गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 10:03 AM2022-10-08T10:03:02+5:302022-10-08T10:04:54+5:30
गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पक्षकाने संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी नाव पकडली आहे. या बोटीवर अल तस्कर असं नाव लिहिण्यात आले होते.
गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पक्षकाने संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी नाव पकडली आहे. या बोटीवर अल तस्कर असं नाव लिहिण्यात आले होते. या बोटीतून ५० किलो हेरॉईन जप्त केले. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३५० कोटी असल्याचे बोलले जात आहे.
या बोटीत एकुण ६ जण होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना आणि तटरक्षक दलाला या प्र्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोन्ही दलांनी संयुक्त मोहीम राबवली. या बोटीच्या पुढील चौकशीसाठी जखाऊ येथे आणण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून ड्रग्जविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.
दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, वाचा सविस्तर
या अगोदर एटीएसला १३ सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानातून एक बोट भारताच्या दिशेने येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर एटीएसने कारवाई करत एक बोट पकडली होती. या बोटीतून ४० किलो हेरॉईन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.