गुजरात: शहरात भाजपा तर गावात काँग्रेस यशस्वी

By Admin | Published: December 2, 2015 02:23 PM2015-12-02T14:23:35+5:302015-12-02T18:28:16+5:30

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने महत्वाच्या महानगरपालिका आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवल असल तरी, ग्रामीण गुजरातमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे.

Gujarat: BJP in city and Congress successful in village | गुजरात: शहरात भाजपा तर गावात काँग्रेस यशस्वी

गुजरात: शहरात भाजपा तर गावात काँग्रेस यशस्वी

googlenewsNext
>ऑनलाईन लोकमत
अहमदाबाद, दि. २ - गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने महत्वाच्या महानगरपालिका आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवल असल तरी, ग्रामीण गुजरातमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे. ब-याच वर्षानंतर काँग्रेसने येथे पूनरागमन केले आहे. 
पाटीदार पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलची न चाललेली लाट हीच या निवडणूकीत भाजपसाठी समाधानाची एकमेव बाब आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. शहरी भागात भाजपने चांगली कामगिरी केली आहे मात्र ग्रामीण भागात काँग्रेसचा आलेख उंचावला आहे. 
५६ महापालिकांपैकी ४० महापालिका भाजपने जिंकल्या तर, ३१ जिल्हा पंचायतींपैकी २० काँग्रेसने जिंकल्या आहेत. मागच्या २०१० मध्ये भाजपने ३० तर, काँग्रेसला फक्त एका जिल्हा पंचायतीमध्ये विजय मिळवला होता. 
हार्दिकने पटेल समाजाला भाजप विरोधात मतदान करण्याचे आव्हान केले होते. मात्र त्याचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे निकालावरुन दिसत आहे. 
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १८२ सदस्यांच्या विधानसभेत ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. 
नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये गेल्यानंतर भाजपची गुजरातवरील पकड सैल झाल्याचे या निकालांवनरुन दिसत आहे. 

Web Title: Gujarat: BJP in city and Congress successful in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.