चमत्कार! कालचा तो, आज झाली ती; पत्नीला घटस्फोट देऊन स्वत:च बनला पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 02:54 PM2021-08-26T14:54:33+5:302021-08-26T14:54:51+5:30
आरव पटेल बनला आएशा पटेल; विज्ञानाच्या मदतीनं घडला चमत्कार
नवी दिल्ली: तुम्ही जसे जन्माला आलात, तसंच जीवन जगण्याची गरज नसते. कारण २१ व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. गुजरातच्या आएशा पटेलसोबत असंच घडलं आहे. आएशा आधी पुरुष होता. पण विज्ञानाच्या मदतीनं आता आरवची आएशा झाली. विज्ञानानं आरवला आएशा होण्यास मदत केली, तर रोहन पटेलनं आरवला मानसिक आधार दिला.
महिला व्हावं असं मला लहानपणापासून वाटत होतं. मला मुलींचे कपडे जास्त आवडायचे. मी लहानपणी बाहुलीसोबत खेळायचे, असं आएशा पटेलनं सांगितलं. आरव ते आएशा या प्रवासात पती रोहन पटेलनं मोलाची मदत केली. आरवला आएशा होता यावं यासाठी रोहननं मानसिक आधार दिला. आरव आधी घाबरत होता. मात्र त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत घडल्या.
आरवचं आधी एका मुलीच्या लग्न झालं होतं. मात्र तो कधीही पती होऊ शकला नाही. त्याचा संसार नीट चालला नाही. पत्नीसोबत काडीमोड झाल्यानंतर आरवची भेट सूरतच्या रोहन पटेलशी झाली. दोघे ऑनलाईन भेटले. दोघांची जवळीक वाढली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांना लग्न केलं. आरवला कायम महिला म्हणून जगण्याची इच्छा होती. मात्र शरीरानं तो पुरुष होता.
लग्नानंतर रोहननं केलेल्या मदतीमुळे आरवनं आएशा होण्याचा निर्णय घेतला. सूरतमधील तीन डॉक्टरांच्या मदतीमुळे हे शक्य झालं. प्लास्टिक सर्जन आशुतोष शहा, रिकंस्ट्रिक्टिव युरोजोलिस्ट डॉक्टर ऋषि ग्रोवर आणि जीआय डॉक्टर धवल मांगुकिया यांनी आरवच्या शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.