CoronaVirus News: भय इथले संपत नाही! फूटावर फूटावर २५ चिता जळताहेत; अंत्यविधींना स्मशानं कमी पडताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:25 AM2021-04-15T10:25:58+5:302021-04-15T10:27:49+5:30

CoronaVirus News: स्मशानभूमीतील शवदाहिन्या २४ तास सुरू; तरीही स्मशानाबाहेर अनेक मृतांचे नातेवाईक वेटिंगवर

gujarat coronavirus news scary situation long wait at crematoriums after surge in corona deaths | CoronaVirus News: भय इथले संपत नाही! फूटावर फूटावर २५ चिता जळताहेत; अंत्यविधींना स्मशानं कमी पडताहेत

CoronaVirus News: भय इथले संपत नाही! फूटावर फूटावर २५ चिता जळताहेत; अंत्यविधींना स्मशानं कमी पडताहेत

Next

अहमदाबाद: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग चिंता वाढवणारा असून गेल्या १० दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. १० दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदा २४ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज देशात २ लाख रुग्ण आढळून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, अशी भीषण दृश्यं सध्या दिसू लागली आहेत. (gujarat coronavirus scary situation long wait at crematoriums after surge in corona deaths)

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेल

महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. त्यामुळे शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू आहेत. 

हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने महिलेनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा

सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी २५ जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत.

गुजरातच्या महत्त्वाच्या शहरांमधील काही स्मशानं अनेक महिन्यांपासून बंद होती. मात्र आता ती स्मशानं सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अहमदाबादमधल्या काही मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी तब्बल ८ तास वाट पाहावी लागली. शहरात वाडाज आणि दुधेश्वर या दोन प्रमुख स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

Web Title: gujarat coronavirus news scary situation long wait at crematoriums after surge in corona deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.