Nitin Patel: "जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच भारतात घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील’’, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:24 AM2021-08-28T11:24:40+5:302021-08-28T11:25:43+5:30

Hindu majority in India: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता भारताच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Gujarat Deputy CM Nitin Patel Says, "As long as there is a Hindu majority, the constitution, secularism and law will survive in India" | Nitin Patel: "जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच भारतात घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील’’, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान 

Nitin Patel: "जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच भारतात घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील’’, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान 

अहमदाबाद - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता भारताच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. भारतात जोपर्यंत हिंदू धर्मीय बहुसंख्याक आहेत तोपर्यंतच या देशात घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा टिकून राहील, असे विधान नितीन पटेल यांनी केले आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. (Gujarat Deputy CM Nitin Patel Says,  "As long as there is a Hindu majority, the constitution, secularism and law will survive in India")

गुजरातचे उपमुख्यमंत्री असलेले नितीन पटेल म्हणाले की, घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या कमी झाली तर त्या दिवशी ना कुठलीही कोर्ट कचेरी असेल. ना कुठला कायदा असेल,  ना कुठली लोकशाही असेल, ना कुठली घटना असेल, सर्व काही हवेत दफन होऊन जाईल.

नितीन पटेल यांनी हे वक्तव्य गांधीनगरमधील भारतमाता मंदिरामध्ये केले. हे मंदिर भारतमातेचे पहिले मंदिर असल्याचे मानले जाते. ज्यावेळी नितीन पटेल यांनी हे विधान केले, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा आणि व्हीएचपी व आरएसएसचे अनेक वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. 

Web Title: Gujarat Deputy CM Nitin Patel Says, "As long as there is a Hindu majority, the constitution, secularism and law will survive in India"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.