Gujarat Election 2022: क्रिकेटपटू रवींद्र जडेजा पत्नीला जिंकवण्यासाठी, त्याची बहीण वहिनीची विकेट घेण्यासाठी मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 10:16 AM2022-11-25T10:16:48+5:302022-11-25T10:17:44+5:30
Gujarat Election 2022: जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे.
- कमलेश वानखेडे
जामनगर : जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे. पत्नीला जिंकवण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला असून, तो सभा, रोड शोमधून प्रचार करीत आहे, तर जडेजा यांची बहीण नयना या महिला काँग्रेसच्या पदाधिकारी असून, वहिनीची विकेट घेण्यासाठी दररोज नवनवीन आरोपांची गुगली टाकत आहेत. या हायप्रोफाइल सीटवर नणंद - भावजयीमध्ये सुरू असलेली ठसन खूप गाजत असून, अख्ख्या गुजरातचे याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे उपमहापौर ‘आप’कडून मैदानात
भाजपचे माजी उपमहापौर करसम करमूर हे आपकडून रिंगणात उतरले आहेत. करमूर हे आहीर समाजाचे असून, या समाजाचेही मतदारसंघात मोठेे प्राबल्य आहे. ते भाजपचे काहीअंशी नुकसान करतील, असा दावाही अनेक मतदार करीत आहेत.
रिवाबाची नणंद नयना म्हणते ‘हात’ नहीं छोडुंगी!
nकाँग्रेसने राजपूत असलेले दीपेंद्रसिंह जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. ते व्यापारी असून, चेंबर ऑफ कॉमर्सचे महामंत्री आहेत. त्यांच्या प्रचारात जडेजाची बहीण नयना आघाडीवर आहे.
nनयना यांनीही काँग्रेसकडे तिकीट मागितले होते; पण ते मिळाले नसले तरी त्या वहिनी रिवाबांच्या विरोधात गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून आक्रमकपणे प्रचार करीत आहेत.