Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 09:01 PM2022-11-09T21:01:15+5:302022-11-09T21:07:40+5:30

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पक्षाला नकार कळवला आहे.

Gujarat Election: Big news! 9 Ministers including former Chief Minister-Deputy Chief Minister of Gujarat refused to contest elections | Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

googlenewsNext

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


सौरभ पटेल हे अंबानी कुटुंबाचे जावई आहेत. नरेंद्र मोदी सरकार आणि विजय रुपाणी सरकारमध्ये ते ऊर्जामंत्रीही राहिले आहेत. यावेळी ते निवडणूक लढवणार नाहीत. गुजरातमधील नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारमधील कोणता मंत्री निवडणूक लढवणार याबाबत साशंकता कायम आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.

नवीन लोकांना संधी द्यावी : रुपाणी
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप यावेळीही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भाजपचे बडे नेते गुजरातच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून जोरदार प्रचारात गुंतले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, निवडणुकीत नव्या लोकांना, कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही. तसे पत्र दिल्लीला पाठवले आहे. केंद्रीय निवडणूक समिती जे काही उमेदवार निवडेल, त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करेल.

हे मंत्री निवडणूक लढवणार नाहीत
राजकोट पश्चिम - विजय रूपाणी - मुख्यमंत्री 
मेहसाणा- नितीन पटेल - उपमुख्यमंत्री
वटवा - प्रदीप सिंह जडेजा - गृह मंत्री
ढोलका- भूपेंद्रसिंह चुडासमा- शिक्षण मंत्री
बोटाद- सौरभ पटेल- ऊर्जा मंत्री
भावनगर - विभावरी दावे - महिला आणि बालविकास मंत्री 
अहमदाबाद, ठक्कर बापानगर  - वल्लभ काकडिया - ट्रांसपोर्ट मंत्री 
जामनगर, कालावाड - आर सी फलदू - कृषी मंत्री
 

Web Title: Gujarat Election: Big news! 9 Ministers including former Chief Minister-Deputy Chief Minister of Gujarat refused to contest elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.