गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदान १ व ५ डिसेंबर रोजी २ टप्प्यांत, निकाल ८ डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:15 AM2022-11-04T06:15:40+5:302022-11-04T06:16:01+5:30

आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली होती; पण गुजरातची निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते.

Gujarat election bugle sounded; Voting in 2 phases on 1st and 5th December, result on 8th December | गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदान १ व ५ डिसेंबर रोजी २ टप्प्यांत, निकाल ८ डिसेंबरला

गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदान १ व ५ डिसेंबर रोजी २ टप्प्यांत, निकाल ८ डिसेंबरला

googlenewsNext

नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. या निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशसोबत ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केली.  

आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली होती; पण गुजरातची निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. गुजरात निवडणुकीच्या घोषणेला विलंब झाल्याबद्दल विरोधकांकडून होणारी पक्षपातीपणाची टीका आयोगाने फेटाळली आहे. गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. असे असताना ११० दिवस अगोदरच निवडणुका जाहीर झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले. राज्यात माेरबी येथे दुर्घटना घडल्याने तसे होऊ शकले नाही, असे राजीव कुमार म्हणाले.

४ कोटींवर मतदार
गुजरातमध्ये एकूण ४.९ कोटी पात्र मतदार आहेत. ४.६ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात ३४,२७६ व शहरी भागात १७,५०६ अशी एकूण ५१,७८२ मतदान केंद्रे असतील. 

निवडणुकीचा कार्यक्रम 
पहिला टप्पा     दुसरा टप्पा 
अधिसूचना जारी     ५  नोव्हेंबर     १० नोव्हेंबरला 
अर्ज भरणे     १४ नोव्हेंबर     १७ नोव्हेंबर
अर्जांची छाननी    १५ नोव्हेंबर    १८ नोव्हेंबर 
अर्ज मागे घेणे     १७ नोव्हेंबर    २१ नोव्हेंबर
मतदान      १ डिसेंबर    ५ डिसेंबर 
जागा    ८९     ९३ 

Web Title: Gujarat election bugle sounded; Voting in 2 phases on 1st and 5th December, result on 8th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात