गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर; केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 08:38 AM2022-10-30T08:38:38+5:302022-10-30T08:38:51+5:30

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपविरोधात झुंज देण्याचे ठरविले आहे.

Gujarat Election: Chief Ministerial Candidate to be Announced on November 4; Arvind Kejriwal's announcement | गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर; केजरीवालांची घोषणा

गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर; केजरीवालांची घोषणा

googlenewsNext

सुरत : आम आदमी पक्ष (आप) गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठीचा आपला उमेदवार येत्य़ा ४ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे. ही घोषणा आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. उमेदवार कोण असावा, यासाठी त्यांनी जनतेचा कौल मागितला आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपविरोधात झुंज देण्याचे ठरविले आहे.

केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी आपतर्फे कोण उमेदवार असावा याबाबतची आपली पसंती लोकांनी आमच्या पक्षाला एसएमएस, व्हाॅट्सॲप, व्हाॅईस मेल, ई-मेलद्वारे ३ नोव्हेंबरपर्यंत कळवायची आहे. जनतेने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत दिलेला कौल आम्ही ४ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहोत. आपला गुजरातमध्ये मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. (वृत्तसंस्था)

‘भाजप जनतेचे मत विचारात घेत नाही’

अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातच्या काही मुख्यमंत्र्यांना भाजपने तडकाफडकी बदलले. मुख्यमंत्री बदलाबाबत भाजपने जनतेची मते विचारात घेतली नाहीत. मात्र, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेची पसंती लक्षात घेऊनच आपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविला होता.

९५ टक्के देणग्या एकट्या भाजपलाच : गेहलोत

निवडणूक रोख्यांमधून ९५ टक्के देणग्या एकट्या भारतीय जनता पक्षालाच मिळतात. देणगीदार भीतीमुळे इतर पक्षांना देणग्या देण्यास कचरत आहेत, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. दुसऱ्या पक्षाला देणगी दिली तर त्या देणगीदाराची चौकशी हाेते, असा आरोप गेहलोत यांनी केला.

Web Title: Gujarat Election: Chief Ministerial Candidate to be Announced on November 4; Arvind Kejriwal's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.