"मी दहशतवादी आणि भ्रष्टाचारी असेल तर अटक करा", अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:03 PM2022-11-08T18:03:29+5:302022-11-08T18:18:02+5:30
अरविंद केजरीवाल गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतःला भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून दाखवत आहे. तसेच, अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता अरविंद केजरीवाल यांनी आज एका ट्विटद्वारे भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आपल्याला गोवण्याचा कट रचत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
पंजाब के पहले PM बोले - केजरीवाल आतंकवादी है। HM ने जाँच बिठा दी। क्या हुआ उसका?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 8, 2022
अब गुजरात/MCD के पहले कह रहे हैं केजरीवाल भ्रष्ट है
अरे, केजरीवाल आतंकवादी या भ्रष्ट है तो गिरफ़्तार करो ना?
केजरीवाल ना आतंकवादी है ना भ्रष्ट।केजरीवाल जनता का लाड़ला है। इस से बीजेपी को तकलीफ़ है
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून लिहिले, 'केजरीवाल दहशतवादी आहे. एचएमने तपास सुरू केला होता. त्याचे काय झाले? आता गुजरात/एमसीडीमुळे केजरीवाल भ्रष्ट झाले आहेत. केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर अटक का नाही केली? केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट नाही. केजरीवाल जनतेचा लाडका आहे,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले.
आपकडून जोरदार तयारी सुरू
आपकडून इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. इसुदान गढवी हे AAP चे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटीलही सहभागी होणार आहेत.