Gujarat Election Result 2022: एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:32 AM2022-12-08T10:32:07+5:302022-12-08T10:32:50+5:30

Gujarat Election Result 2022: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे.

Gujarat Election Result 2022: Despite not winning a single seat in Gujarat, AAP's Vote turnout will put pressure on the BJP, AAP Becoming National Party | Gujarat Election Result 2022: एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला

Gujarat Election Result 2022: एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला

googlenewsNext

गुजरातची निवडणूक आपला एक मोठे यश मिळवून देणारी ठरणार आहे. काल दिल्ली महापालिकेत विजय मिळविल्यानंतर आजच आपसाठी गुजरात निवडणूक महत्वाची होती. गेल्या निवडणुकीला आपने गुजरातमध्ये ३६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतू, या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली होती. परंतू, यावेळच्या निवडणुकीत आपने भाजपाची झोप उडविली आहे. 

गुजरातमध्ये आपला अद्यापपर्यंत झालेल्या मतमोजणीत १४ टक्के मतदान झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाला ५३.४ टक्के मतदान झाले आहे. तर आपला १३.५१ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसला २६.६२ टक्के मतदान झाले आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या जनतेच्या मतांमुळे आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बनत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात ओळख बनू लागली आहे. यासाठी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. 
आपची दिल्लीत दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. पंजाबमध्येही आप सत्तेत आली आहे. गोव्यात दोन आमदार आहेत. असे असताना गुजरातमध्ये आज जर आपचे आमदार निवडून आले तर चार राज्यांत आपचे अस्तित्व निर्माण होणार आहे. यानंतर आप कर्नाटकात निवडणूक लढविणार आहे. 

Web Title: Gujarat Election Result 2022: Despite not winning a single seat in Gujarat, AAP's Vote turnout will put pressure on the BJP, AAP Becoming National Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.