Gujarat Election Results 2022 : केजरीवालांनी ज्या 3 नेत्यांची नावं चिठ्ठीवर लिहिली होती, जाणून घ्या गुजरात निवडणुकीत त्यांचं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:46 PM2022-12-08T16:46:15+5:302022-12-08T16:47:58+5:30

एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता.

Gujarat Election Results 2022 : Kejriwal wrote the names of the 3 leaders on the note, know what happened to them in the Gujarat election | Gujarat Election Results 2022 : केजरीवालांनी ज्या 3 नेत्यांची नावं चिठ्ठीवर लिहिली होती, जाणून घ्या गुजरात निवडणुकीत त्यांचं काय झालं?

Gujarat Election Results 2022 : केजरीवालांनी ज्या 3 नेत्यांची नावं चिठ्ठीवर लिहिली होती, जाणून घ्या गुजरात निवडणुकीत त्यांचं काय झालं?

googlenewsNext

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे, तर काँग्रेस आपल्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. यातच, गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. यांपैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

दरम्यान एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता. यात आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांची नावे होती. आम आदमी पक्षाचे हे तीनही नेते निवडणुकीत पराभूत होताना दिसत आहेत.

इसुदान गढवी पिछाडीवर - 
देवभूमी द्वारका येथील खंभालिया जागेवर आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांना उमेदवारी देण्यात आली. या जागेवर भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा उभे आहेत. येथे भाजपच्या उमेदवाराने गढवी यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

गोपाल इटालिया यांचा पराभव -
आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हे गुजरातमधील कतरगाम विधानसभा जागेवरून मैदानात उतरले होते. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विजयाचाही दावा केला होता. या जागेवर भाजपचे विनू मोरडिया यांना 110515 तर गोपाल इटालिया यांना 49856 मते मिळाली आहेत. भाजपने ही जागा 60,659 मतांनी जिंकली आहे.

अल्पेश कथिरिया -
पाटीदारांचा गड मानल्या जाणाऱ्या वराछा जागेवर पटेल आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेले अल्पेश कथिरिया आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक मैदानात उतरले होते. अरविंद केजरीवाल यांनी अल्पेश कथिरिया यांच्या विजयाचाही दावा केला होता. मात्र, येथेही भाजप उमेदवार किशोर कनाणी मोठ्या संख्येने आघाडीवर आहेत.

Web Title: Gujarat Election Results 2022 : Kejriwal wrote the names of the 3 leaders on the note, know what happened to them in the Gujarat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.