Gujarat elections 2022: दिल्ली-पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये 300 युनिट मोफत वीज; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:45 PM2022-07-21T14:45:47+5:302022-07-21T14:47:08+5:30

Gujarat elections 2022: आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Gujarat elections 2022: 300 units of free electricity in Gujarat like Delhi-Punjab; Arvind Kejriwal's announcement | Gujarat elections 2022: दिल्ली-पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये 300 युनिट मोफत वीज; अरविंद केजरीवालांची घोषणा

Gujarat elections 2022: दिल्ली-पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये 300 युनिट मोफत वीज; अरविंद केजरीवालांची घोषणा

Next

Gujarat elections 2022: आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. सध्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या केजरीवालांनी मोठी घोषणा केली. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे आता गुजरातमध्येही 24 तास मोफत वीज देणार असल्याची मोठी घोषणा केजरीवालांनी केली आहे.

'गुजरातमध्ये मोफत वीज मिळणार'
अरविंद केजरीवाल गुरुवारी गुजरातमध्ये पोहोचले. येथे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची पहिली हमी जाहीर केली. केजरीवाल यांनी गुजरातमध्ये मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, "सध्या देशात महागाई खूप वाढली आहे. महागाई ही सामान्यांसाठी एक मोठी समस्या आहे. विजेच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. पण, ज्याप्रकारे आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये मोफत वीज दिली, त्याचप्राणे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर मोफत वीज देऊ." 

केजरीवाल म्हणाले, आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये विजेबाबत तीन कामे केली. गुजरातमध्येही तेच करणार.
1- सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज
2- 24 तास वीज उपलब्ध होणार, वीज मोफत मिळणार आहे. वीजपुरवठा कधीही खंडित होणार नाही.
3- 31 डिसेंबर 2021 पर्यंतची जुनी घरगुती बिले माफ केली जातील.

नरेंद्र मोदींवर निशाणा
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ''गुजरातमध्ये दारू सहज मिळते. आम्हाला अवैध दारू विकून देणगी गोळा करण्याची गरज नाही. मोफत वीज, मोफत शिक्षणाप्रमाणे आम्ही मोफत रेवाडीही लोकांमध्ये वाटली आहे, तो देवाचा प्रसाद आहे. पण हे लोक फुकट रेवडी फक्त त्यांच्या मित्रांना देतात, त्यांचे कर्ज माफ करतात, हे मोठे पाप आहे. जनतेला मोफत रेवाडी दिल्याने श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. आपल्या मित्रांना, मंत्र्यांना देऊन असे प्रसंग घडतात,'' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Web Title: Gujarat elections 2022: 300 units of free electricity in Gujarat like Delhi-Punjab; Arvind Kejriwal's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.