Gujarat Elections: क्रिकेटनंतर आता रवींद्र जडेजा राजकीय मैदानात; पत्नीसाठी जामनगरमध्ये केला प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 02:27 PM2022-11-14T14:27:57+5:302022-11-14T14:28:48+5:30
Gujarat Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपने जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली आहे.
Gujarat Elections : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजा भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जजेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे, तर पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा मैदानात उतरला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रिवाबा आणि रवींद्रने सोमवारी जामनगरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली.
जडेजाने पत्नीसाठी मतदान मागितले
या कार्यक्रमात रिवाबा पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसली, तर रवींद्र भगव्या रंगाच्या कुर्त्यात दिसला. रवींद्र जडेजाच्या कुर्त्याचा रंग पाहून, तोही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने जामनगर (उत्तर) मतदारसंघातून रिवाबा जडेजा हिला उमेदवारी दिली आहे. या कार्यक्रमात रवींद्र जडेजाने जामनगरमधील जनतेला रिवाबाला मतदान करण्याचे आवाहन केले.
Gujarat | Cricketer Ravindra Jadeja and his wife and BJP leader Rivaba Jadeja attend an event in Jamnagar that has been organised ahead of the filing of nomination for the upcoming #GujaratElections
— ANI (@ANI) November 14, 2022
Rivaba Jadeja will contest from Jamnagar North and file her nomination today. pic.twitter.com/1Ix5tEamf3
रिवाबासाठी मोठ्या नेत्याचे तिकीट कापले
भाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी दिली आहे. रिवाबाला राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांचे तिकीट कापले आहे.
જામનગર ના મારા તમામ મિત્રો ને મારુ દીલ થી આમંત્રણ છે. જય માતાજી🙏🏻 pic.twitter.com/olZxvYVr3t
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 13, 2022
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.