Gujarat Elections: रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा मोठा विजय; जाणून घ्या किती मते मिळाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 02:55 PM2022-12-08T14:55:37+5:302022-12-08T14:56:22+5:30
Rivaba Jadeja in Gujarat Elections: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर (उत्तर)मधून मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 155 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी आणि भाजप उमेदवार रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
गुजरातमधील जामनगर (उत्तर) (Jamnagar North Seat) विधानसभा जागेवरुन रिवाबा जडेजाने निवडणूक लढवली होती. इथे रिवाबाच्या विरोधात काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा आणि आम आदमी पार्टीचे करशनभाई होते. विशेष म्हणजे, इथे रविंद्र जडेजाची बहिण आणि वडिलांनी रिवाबाविरोधा काँग्रेसचा प्रचार केला होता. तरीदेखील, रिवाबाने प्रचंड फरकाने ही जागा जिंकली आहे.
56 टक्क्यांहून अधिक मते
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मतमोजणीच्या 14 फेऱ्यांनंतर रिवाबा जडेजाच्या बाजूने 56 टक्क्यांहून अधिक मते पडली. त्यांना 72 हजारांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पार्टीचे करशनभाई यांना 29 हजार तर काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा यांना 19687 मते मिळाली. या विजयानंतर रिवाबाने सर्वांचे आभार मानले.