Gujarat Fake Currency Case: 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया', फेक करन्सी प्रकरणात मोठा खुलासा; आतापर्यंत 317 कोटी जप्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:06 PM2022-10-05T16:06:30+5:302022-10-05T16:07:26+5:30

Gujarat Fake Currency Case: रुग्णवाहिकेतून पोलिसांनी 2,000 रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले सहा बॉक्स जप्त केले होते.

Gujarat Fake Currency Case: 'Reverse Bank of India', Big Disclosure in Fake Currency Case; 317 crore seized so far | Gujarat Fake Currency Case: 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया', फेक करन्सी प्रकरणात मोठा खुलासा; आतापर्यंत 317 कोटी जप्त...

Gujarat Fake Currency Case: 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया', फेक करन्सी प्रकरणात मोठा खुलासा; आतापर्यंत 317 कोटी जप्त...

Next

Gujarat Fake Currency Case:गुजरातच्या सुरत पोलिसांनी नुकतेच एका रुग्णवाहिकेतून 2,000 रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले बॉक्स जप्त केले. या बॉक्समधून कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सुरुवातीला काही कोटींमध्ये असलेल्या या नोटांची संख्या आता शेकडो कोटींमध्ये गेली आहे.

317 कोटींच्या बनावट नोटा
गेल्या महिन्यात 29 सप्टेंबर रोजी सुरत जिल्ह्यातील कामरेज पोलिसांनी अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावर पारडी गावाजवळ दिकरी एज्युकेशन ट्रस्टची रुग्णवाहिका अडवली, त्यात 25 कोटी रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले 6 बॉक्स होते. मात्र मंगळवारी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी बनावट नोटांचा हा आकडा 316 कोटी 98 लाखांवर पोहोचल्याचा खुलासा केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विकास जैन याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह एकूण 6 जणांना अटक केली आहे. 

मुंबईतून मुख्य सूत्रधार अटक
एसपी हितेश जोयसर यांनी सांगितले की, विकास जैन जेव्हा ट्रस्टला देणगी देण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करायचा, तेव्हा देणगीच्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम अॅडव्हान्स बुकिंग म्हणून घेत असे. या टोळीने राजकोटच्या एका व्यावसायिकाची एक कोटींहून अधिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार विकास जैन असून, तो मुंबईत व्हीआर लॉजिस्टिक्स नावाने कंपनी चालवतो. 

अनेक राज्यात नेटवर्क
या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विकास जैन याने गुजरातमध्येच नव्हे तर मुंबई, दिल्ली, इंदूर आणि बंगळुरूमध्ये संपूर्ण नेटवर्क तयार केले होते. सर्व राज्यांमध्ये आलिशान कार्यालये बांधण्यात आली. या संपूर्ण तपासात सुरत ग्रामीण पोलिसांसह बँकर्स आणि आरबीआयची टीमही लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत पोलिसांनी हितेश परसोत्तम भाई कोटाडिया, दिनेश लालजी भाई पोशिया, विपुल हरीश पटेल, विकास पदम चंद जैन, दीनानाथ रामनिवास यादव आणि अनुष वीरेंद्र शर्मा यांना अटक केली आहे.

जुन्या नोटाही सापडल्या
जानेवारी महिन्यात उत्तर भारतातून 500 कोटींची आयात झाल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पोलिसांनी 2000 आणि 500 ​​च्या नवीन नोटांसह भारत सरकारने बंदी घातलेल्या 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटाही जप्त केल्या आहेत. नोटाबंदीपूर्वीही असे रॅकेट सुरू असावे, असा पोलिसांचा संशय आहे. 

Web Title: Gujarat Fake Currency Case: 'Reverse Bank of India', Big Disclosure in Fake Currency Case; 317 crore seized so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.