गुजरातमध्ये कोविड केअर सेंटरला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 07:20 AM2021-05-01T07:20:16+5:302021-05-01T09:07:27+5:30

Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch : या आगीच्या दुर्घटनेत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

Gujarat : Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch, 12 people died | गुजरातमध्ये कोविड केअर सेंटरला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातमध्ये कोविड केअर सेंटरला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देभरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) भरुच येथील एका कोविड केअर सेंटरला (Covid-19 Care Centre) भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली. दुर्घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, तर रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. (Gujarat Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch. Affected patients are being shifted to nearby hospitals.)

मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 



 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली होती. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर काही रुग्ण गंभीर जखमी झाले होते.

(Virar Hospital Fire : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

Web Title: Gujarat : Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch, 12 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.