तिच बाप अन् तिच माय; आधी स्वत:चं सीमन फ्रिज केलं; आता लिंगबदल करून आई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 11:36 AM2021-02-17T11:36:54+5:302021-02-17T11:37:09+5:30
तिचा तो होणार; वर्षाच्या अखेरीस लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष महिला होणार
अहमदाबाद: मूल जन्माला येण्यासाठी दोन व्यक्ती लागतात. एक महिला आणि एक पुरुष यांच्या माध्यमातून मूल जन्माला येतं. पण गुजरातमध्ये राहणाऱ्या डॉ. जेसनूर दायरा दोन्ही भूमिका पार पाडणार आहेत. त्यांनी स्वत:चं सीमन फ्रिज केलं आहे. आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून गर्भधारणा करण्याचा दायरा यांचा विचार आहे. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे.
गुजरातच्या डॉ. जेसनूर दायरा ट्रान्स वूमन आहेत. म्हणजे त्यांचा जन्म पुरुष म्हणून झाला. पण त्या स्वत:ला महिला मानतात. त्या लवकरच लिंगबदल शस्त्रक्रिया करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांनी त्यांचे सीमन फ्रिज करून सुरक्षित ठेवले आहेत. लिंगबदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर याच सीमनच्या माध्यमातून आई होण्याचा त्यांचा विचार आहे.
बाबो! ४ महिन्यांच्या या गायीला मिळाली २ कोटी रूपये किंमत, पण का?
डॉ. दायरा यांनी नुकतीच रशियातील विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली. त्या गुजरातमधील पहिल्या ट्रान्स वूमन डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म गोध्र्यात झाला आहे. शरीरानं पुरुष असल्या तरी मनानं स्त्री असल्याची जाणीव दायरा यांना लहानपणीच झाली. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीही त्यांच्या कुटुंबाला सांगितली नाही. कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शांत राहणं पसंत केलं.
कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला
दायरा परदेशात असताना त्यांनी स्वत:ची ओळख आणि भावना सर्वांपुढे ठेवण्याचं धाडस केलं. 'मी स्वत:मधलं खरं रुप ओळखलं आणि एका महिलेप्रमाणे राहण्याचं धाडस केलं. ही गोष्ट स्वतंत्र होण्यासारखी होती,' असं दायरा यांनी सांगितलं. आता दायरा यांना थांबायचं नाहीए. त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींनुसार आयुष्य जगायचं आहे. यासाठी त्यांना कुटुंबाचा आणि समाजाचाही पाठिंबा मिळत आहे.
वर्षाच्या अखेरीस लिंग बदल शस्त्रक्रिया
या वर्षाच्या अखेरीस दायरा लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला होतील. त्यामुळे त्यांचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. जैविकदृष्ट्या हे मूल त्यांचं असेल. कारण वडिल म्हणून त्यांच्या सीमनच्या माध्यमातून मूल जन्माला येईल. सरोगसीच्या माध्यमातून मुलाचा जन्म होईल. यानंतर दायरा मुलाचा सांभाळ करतील.