गुजरात सरकार दलितविरोधी!

By admin | Published: July 22, 2016 04:27 AM2016-07-22T04:27:16+5:302016-07-22T05:49:21+5:30

गरीबविरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा संघर्ष दोन विचारसरणींतील आहे, असे म्हटले.

The Gujarat government is anti-Dalit! | गुजरात सरकार दलितविरोधी!

गुजरात सरकार दलितविरोधी!

Next


उना (गुजरात) : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील गुजरातेतील सरकार आणि त्याच्या गरीबविरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा संघर्ष दोन विचारसरणींतील आहे, असे म्हटले.
उना येथे चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या घटनेनंतर गांधी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपण गुजरातेतील दलितांच्या पाठिशी आहोत हे दाखविण्यासाठी गुरुवारी पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाची मी भेट घेतली. त्यांना असे का करावे लागते कारण की त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला येथे कोणी नाही.
या राज्यात गरीब आणि दुबळ््यांना चिरडले जात आहे. हा विचारसरणींचा संघर्ष आहे. एका बाजुला आहेत गांधीजी, नेहरुजी, सरदार पटेलजी आणि आंबेडकरजी तर दुसऱ्या बाजुला आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळवलकर आणि मोदीजी, असे राहुल गांधी राजकोटमध्ये रुग्णालयात पीडितांची भेट घेऊन आल्यावर प्रसारमाध्यमांशी छोटासा संवाद साधताना म्हणाले.
उना येथील दलित कुटुंबांची भेट घेण्याच्या आपल्या एक दिवसाच्या या दौऱ्यात राहुल गांधींनी आपण पीडितांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. त्यांनी पीडितांसोबत बशीत चहा पिवून त्यांच्या कुटुंबियांसोबत अनौपचारिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत उना तालुक्यातील मोटा समधीयाला खेड्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उना येथे शुक्रवारी पीडित तरुणांची भेट घेणार आहेत. (वृत्तसंस्था)
>पीडित तरुणांच्या कुटुंबांंना राष्ट्रवादीची मदत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पक्षाचे राज्यातील नेते जयंत पटेल आणि कंधल जाडेजा यांच्यासोबत जाऊन पीडित तरूण भानुभाई सरवैय्ये आणि त्याच्या कुटुंबियांची मोटा समधियाला येथे जाऊन भेट घेतली व त्यांना दोन लाख रूपये भरपाईपोटी दिले. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी घटनेनंतर पीडितांना भेटण्यासाठी तब्बल नऊ दिवस लावल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.
बुधवारी रात्री राजकोट, मेहसाणा येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या तर दुसऱ्या दिवशी सुरत आाणि लिंबडी येथे निषेध मोर्चे निघाले. राजकोट येथे बसस्टँडची नासधूस करण्यात आली तर मेहसाणा जिल्ह्यातील उंझा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसची मोडतोड झाली.
>दलित लक्ष्य : उना गावाला सत्यशोधन समितीने दिलेल्या भेटीमध्ये गोरक्षकांसाठी दलित समाजाला लक्ष्य करून मर्दुमकी दाखविणे सोपे झाल्याचे आढळले. या समितीमध्ये दलित अधिकार मंचसह वेगवेगळ््या शहरांतील स्वयंसेवी संस्थांमधील दलितांचा समावेश होता. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेली मारहाण दुपारी दीडपर्यंत सुरू होती. तरुणांच्या कुटुंबियांनी वारंवार पोलिसांना फोन करूनही त्यांनी काही केले नाही असा समितीचा आरोप आहे.
>उना (जि. सोमनाथ) खेड्यातील चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ गुजरातच्या काही भागांत गुरुवारीही निदर्शने झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पीडित तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी मोटा समाधियाला खेड्यात जाऊन त्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतले. त्यांच्यासमवेत काँग्रेस सरचिटणीस गुरूदास कामत, खा. राजीव सातव व कुमारी सैलजा हेही होते.

Web Title: The Gujarat government is anti-Dalit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.