गुजरात सरकारला केंद्राने खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:10 AM2020-08-21T05:10:14+5:302020-08-21T05:10:20+5:30
या प्रकल्पाच्या कामात कमालीची दिरंगाई होत असल्यावरून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने गुजरात सरकारला चांगलेच खडसावले आहे.
Next
नवी दिल्ली : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतहत गुजरातमधील साबरमती आणि तापी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देऊन सहा वर्षे उलटनूही या प्रकल्पाच्या कामात कमालीची दिरंगाई होत असल्यावरून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने गुजरात सरकारला चांगलेच खडसावले
आहे.
२०१४ मध्ये निधी मंजूर करूनही साबरमती नदीवरील प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच तापी नदीवरील प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी जारी करून जवळपास सोळा महिने होऊनही या प्रकल्पाचे काहीच काम झालेले नाही. गंगेच्या खोऱ्याबाहेरील नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी या योजनेतहत केंद्र सरकारकडून निधी दिला जातो.