कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:25 AM2021-03-07T09:25:35+5:302021-03-07T09:28:16+5:30
आरोग्य अधिकारी घरातच विलगीकरणात; उपचार सुरू
गांधीनगर: कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
गांधीनगरच्या देहगाम तालुक्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यानं १६ जानेवारीला कोरोना लसीचा पहिला डोज घेतला. त्यानंतर १५ फेब्रुवारीला त्यानं लसीचा दुसरा डोज घेतला. दुसरा डोज घेतल्यानंतर अधिकाऱ्याला ताप आला. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. २० फेब्रुवारीला चाचणीचा अहवाल आला. तो पॉझिटिव्ह होता, अशी माहिती गांधीनगरचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. एम. एच. सोळंकी यांनी दिली.
"हा काय ज्येष्ठ नागरिक आहे का?" कोरोना लस घेतल्यामुळं सैफ अली खान झाला ट्रोल
कोरोनाची लागण झालेल्या आरोग्य अधिकाऱ्याला सध्या घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांना सौम्य लक्षणं जाणवली आहेत. ते लवकरच कामावर रूजू होतील, असा विश्वास सोळंकी यांनी व्यक्त केला. कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश
कोरोना लस घेतल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळणं गरजेचं असल्याचं सोळंकी म्हणाले. 'कोरोना लस घेतल्यानंतरही मास्क वापरणं, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे,' असं त्यांनी सांगितलं.