Gujarat, Himachal Pradesh Assembly Election Results 2022: गुजरात-हिमाचलचा आज फैसला; राजकीयदृष्ट्या ‘निकाल दिन’ ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:03 AM2022-12-08T07:03:18+5:302022-12-08T07:03:56+5:30
सकाळी ८ वाजेपासून कल येण्यास सुरुवात होईल.
नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने बाजी मारली असताना गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुरुवार हा राजकीयदृष्ट्या ‘निकाल दिन’ ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर आणि खतौली, राजस्थानमधील सरदार शहर, बिहारमधील कुडनी, ओडिशातील पदमपूर आणि छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर या विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली असून, तेथील निकाल गुरुवारी हाती येणार आहेत.