तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 11:39 AM2021-01-24T11:39:50+5:302021-01-24T11:47:30+5:30

India And Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे.

gujarat kutch cattle herder who crossed over to pakistan in 2008 returns to india | तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

Next

नवी दिल्ली - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक मेंढपाळ 2008 मध्ये चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेला होता. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली असून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील नाना दिनारा गावातील 60 वर्षीय इस्माईल समा राहतात. आपल्या मेंढ्या चारत असताना चुकून त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. 

भारतीय उच्चायुक्तानी दाखल केलेल्या एका याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोन दिवस आधीच इस्माईल समा यांची मुक्तता करण्यात आली आहे. अटारीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन इस्माईल समा हे अमृतसरला पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना घेण्यासाठी वाघा-अटारी बॉर्डरवर दाखल झाले होते. अमृतसरमध्ये काही औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या जातील. ज्यामध्ये समा यांच्या आरोग्य तपासणीचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

"मी आपल्या मेंढ्यांना चारत असताना चुकून पाकिस्तानच्या दिशेनं गेलो होतो. त्यांनी मला एक गुप्तहेर आणि RAW एजंट म्हणून अटक केली. आयएसआयने मला 6 महिने कारागृहात ठेवलं. त्यानंतर मला पाकिस्तानच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं. 5 वर्षे शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी मी 3 वर्षे त्यांच्या ताब्यात होतो. ऑक्टोबर 2016 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही माझी सुटका करण्यात आली नाही. मी 2018 पर्यंत हैदराबाद सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यानंतर मला दोन अन्य भारतीय कैद्यांसोबत कराचीच्या कारागृहात पाठवण्यात आलं" अशी माहिती इम्साईल समा यांनी दिली आहे.

पत्रकार जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, समा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर पीस अँड डेमोक्रसी आणि अन्य एका स्थानिक एनजीओने दोन्ही सरकारकडे संपर्क सुरू केला. त्याचबरोबर पाकिस्तान उच्चायुक्तांना एक पत्र लिहिलं आणि समा यांच्या सुटकेची मागणी केली. समा यांची सुटका ही भारतीय उच्चायुक्तांनी चार भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर होऊ शकली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: gujarat kutch cattle herder who crossed over to pakistan in 2008 returns to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.