मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 07:21 PM2022-10-30T19:21:07+5:302022-10-30T19:57:22+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती झाली होती.
मोरबी: गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटला आहे. या दुर्घटनेत पुलावरील अनेक लोक पाण्यात पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100हून अधिक लोक पाण्यात पडल्याची माहिती आहे. तसेच, या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Gujarat | A cable bridge collapsed in the Machchhu river, Morbi area today. Several people fear injured. Further details awaited. pic.twitter.com/OZrDTxCWqx
— ANI (@ANI) October 30, 2022
विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच या झुलत्या पुलाची दुरुस्ती केली होती. पूल कोसळला, तेव्हा पुलावर शेकडो लोक होते. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. हा पूल पडल्यानंतर तिथे उपस्थित काही लोकांनी घटनेचा व्हिडिओ काढला. यात अनेकजण नदीत पडल्याचे दिसत आहे.