या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 06:54 PM2022-12-26T18:54:06+5:302022-12-26T18:54:15+5:30

Couple Goal: गुजरातच्या सूरतमध्ये ही अजब घटना घडली आहे.

Gujarat news! Girlfriend went to give exams instead of boyfriend | या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर...

या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर...

Next


Girlfriend Appears Exam: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडशी संबधित अनेक विचित्र प्रकरणे समोर येत असतात. गुजरातमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एक तरुणी तिच्या प्रियकराच्या ठिकाणी पेपर द्यायला गेली. ती पेपर देत होती, पण शेवटच्या क्षणी पकडली गेली. मुलगा परीक्षेला न येण्याचे कारण ऐकून सर्वजण चकीत झाले.

मुलगी सरकारी कर्मचारी 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सूरत येथील वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठातील आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, तरुणीचा प्रियकर कॉलेजमध्ये शिकतोय तर तरुणी सरकारी कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही मुलगी तिच्या प्रियकरासाठी परीक्षा देण्यासाठी पोहोचली. प्रियकर हा बीकॉमच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याची परीक्षा होती.

प्रियकर उत्तराखंडमध्ये सुट्टी घालवत आहे
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे प्रियकर स्वतः उत्तराखंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता आणि त्याच्या जागी ही मुलगी परीक्षेला बसली होती. यासाठी मुलीने प्रवेशपत्रावर मुलाच्या ऐवजी तिचा पासपोर्ट फोटो चिकटवला आणि परीक्षा हॉलमध्ये पोहोचली. पण तिच्या शेजारी बसलेल्या एका मुलाने दक्षता पथकाला सांगितले की, आदल्या दिवशीच्या या ठिकाणी मुलगा बसला होता.

तरुणी त्याच कॉलेजमधून उत्तीर्ण झाली
अधिकाऱ्यांनी तपास केला असता हे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे आरोपी गर्लफ्रेंडही याच कॉलेजमधून बीकॉम पासआउट आहे. यानंतर पथकाने या डमी उमेदवाराला पकडले. कारवाई करत कॉलेज प्रशासनाने मुलाच्या सर्व परीक्षा रद्द करून त्याला बंदी घातली आणि मुलीवर कारवाई करण्याची शिफारसही केली.

Web Title: Gujarat news! Girlfriend went to give exams instead of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.