गुजरात भारताचा भाग नाही का? - सुप्रीम कोर्ट
By Admin | Published: February 1, 2016 06:14 PM2016-02-01T18:14:21+5:302016-02-01T18:16:21+5:30
संसदेत पारित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी गुजरातमध्ये का होत नाही, गुजरात भारताचा भाग नाही का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - संसदेत पारित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी गुजरातमध्ये का होत नाही, गुजरात भारताचा भाग नाही का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.
संसदेत काय चालु आहे? भारताचा गुजरात एक भाग नाही का? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे आणि गुजरातमध्ये याची अंबलबजावणी करण्यात आली नाही. उद्या कोणीही भारतीय दंड विधान आणि पुरावा कायद्यांची अंमलबजावणी होणार नाही असे म्हणेल, असे खंडपीठाचे न्यायाधीश मदन बी लोकूर यांनी सांगितले.
गुजरातमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे गुजरातच्या सरकारी वकील हेमांतिका वाहाई यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले.
स्वराज अभियान संघटनेचे योगेद्र यादव यांनी यासंदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.