गुजरातला सीरियल ब्लास्ट, RSS-VHP नेते टार्गेटवर; पुणे मॉड्युलचा हादरवणारा कट उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:27 AM2024-01-09T10:27:24+5:302024-01-09T10:28:05+5:30

आयएसआयएस हँडलर अबु सुलेमानच्या सांगण्यावरून गुजरात हादरवण्याचा कट रचला गेला होता हे दहशतवादी शाहनवाज आलमनं कबुल केले.

Gujarat serial blasts, RSS-VHP leaders targeted; Shocking plot of Pune module exposed by ISIS terrorist Shahnawaz | गुजरातला सीरियल ब्लास्ट, RSS-VHP नेते टार्गेटवर; पुणे मॉड्युलचा हादरवणारा कट उघड

गुजरातला सीरियल ब्लास्ट, RSS-VHP नेते टार्गेटवर; पुणे मॉड्युलचा हादरवणारा कट उघड

नवी दिल्ली - दिल्ली पोलीस आणि एनआयएच्या तपासात मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहनवाज आलमने अनेक मोठे खळबळजनक खुलासे केले आहेत. एनआयएच्या टीमनं दिल्लीतून त्याला अटक केली. आता तपास यंत्रणेकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

त्यात पुणे महाराष्ट्र मॉड्युलच्या निशाण्यावर आरएसएस, VHP आणि भाजपा नेते होते. इतकेच नाही गुजरात आणि मुंबईत सीरियल ब्लास्ट करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. गुजरातच्या गांधी नगर, अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि गोधरा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आयएसआयएसनं पूर्ण गुजरात बॉम्बस्फोटानं हादरवण्याची तयारी केली होती. या मॉड्युलचे आणखी काही दहशतवादी फरार असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. 

आयएस दहशतवादी शाहनवाज आलमनं चौकशीत सांगितले की, गुजरातच्या भाजपा मुख्यालयात, आरएसएस मुख्यालय, VHP मुख्यालय, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, विद्यापीठे, मंदिरे, रेल्वे स्टेशन आणि गर्दी ठिकाणे असणाऱ्या बाजारपेठा हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्यात अनेक मोठे नेते आणि VVIP मान्यवर यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. या सर्व गोष्टीची रेकी सुरू होती. दहशतवाद्यांनी व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करून त्याचे फोटो परदेशातील त्यांच्या हँडलरला पाठवले होते. गुजरातच्या विविध भागात रेकी करण्यासाठी दहशतवाद्यांनी दुचाकीचा वापर केला होता. 

आयएसआयएस हँडलर अबु सुलेमानच्या सांगण्यावरून गुजरात हादरवण्याचा कट रचला गेला होता हे दहशतवादी शाहनवाज आलमनं कबुल केले. सूत्रांनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या आडून हा खेळ खेळत आहे. याआधीही दहशतवाद्यांच्या नापाक इरादे भारतीय तपास यंत्रणांनी अयशस्वी केले. आताही पुणे महाराष्ट्र मॉड्युलच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली. एनआयएची टीम मागील १ वर्षापासून हे मॉड्युल उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, दहशतवादी शाहनवाज आलमनं महाराष्ट्रातील नागपूर येथून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले. हा दहशतवादी आधी वडोदरा स्टेशनला गेला त्याठिकाणी रेल्वे स्टेशनजवळच एका हॉटेलमध्ये रुम बुक केली. दुसऱ्या दिवशी त्याने भाड्याने दुचाकी घेतली आणि जिल्हा कोर्ट, सिव्हिल कोर्ट, रेल्वे स्टेशनची रेकी केली होती. या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी त्याने व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी केली. त्याच संध्याकाळी तो दुचाकीवरून परतला आणि रेल्वेने सूरतला निघाला. त्यानंतर पुन्हा सूरतमधील महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केली. 
 

Web Title: Gujarat serial blasts, RSS-VHP leaders targeted; Shocking plot of Pune module exposed by ISIS terrorist Shahnawaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात