गुजरात भूकंपाने हादरला
By admin | Published: March 14, 2017 12:22 AM2017-03-14T00:22:53+5:302017-03-14T00:22:53+5:30
उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी दुपारी ३.५२ वाजता भूकंप झाला. याची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती
अहमदाबाद : उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी दुपारी ३.५२ वाजता भूकंप झाला. याची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. मात्र, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. गांधीनगर येथील इन्स्टिट्यूट आॅफ सीस्मोलॉजिकल रिसर्च (आयएसआर)च्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू हा दीसा शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर होता.
भूकंपाच्या केंद्रस्थानी एक पथक पाठविले असल्याचे बनारसकांठाचे जिल्हाधिकारी जेनू देवन यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही या भूकंपामुळे जमिनीवर होणाऱ्या परिणामाची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा धनेरा शहराजवळील सिया गाव हे होते. कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)