गुजरातमध्ये मोदींच्या सभेत महिलेचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात
By admin | Published: March 8, 2017 06:05 PM2017-03-08T18:05:14+5:302017-03-08T18:05:14+5:30
गुजरातच्या गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका महिलेने गोंधळ घातला.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 8 - गुजरातच्या गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका महिलेने गोंधळ घातला. पंतप्रधानांविरोधात या महिलेने नारेबाजी केली. गोंधळ घालणा-या त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आपल्या समस्यांबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या अनेकदा फे-या मारल्या पण तिच्या समस्या ऐकून घातल्या जात नाहीत असा आरोप गोंधळ घालणा-या महिलेने केला आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त गांधीनगरमध्ये मोदी महिला सरपंचांना संबोधित करणार होते. पंतप्रधानांनी बोलण्याआधीच गौतमबुद्ध नगरमध्ये राहणा-या शालिनी नावाच्या महिलेने जोरदार गोंधळ घालायला सुरूवात केली.
दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्येच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या गाडीवरही अंडी फेकण्यात आली होती. पाटीदार समाजातील काही लोकांनी शाह यांच्या गाडीवर अंडे फेकले. अमित शाह यांचा ताफा सोमनाथला जात असताना जुनागडच्या केशोदजवळ शाह यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली. त्यांचा ताफा जात असताना रस्त्यात काही पाटीदार समाजाचे लोकं उभी होती त्यांनी ताफ्यावर अंडी फेकली. पंतप्रधान मोदींसोबत सोमनाथमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांचा ताफा सोमनाथकडे निघाला होता. रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी आरक्षणाची मागणी करणा-या पाटीदार समाजावर लाठीमार करण्यात आला होता. पाटीदार आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी अमित शाह यांच्या इशा-यावरच लाठीमार झाल्याचा आरोप केला होता त्यामुळे त्यांच्यावर अंडी फेकण्यात आल्याची शक्यता आहे.