गुजरात हादरलं! द्वारका येथे ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:13 PM2021-11-04T19:13:46+5:302021-11-04T19:14:05+5:30
Earthquake in Gujrat : आज सकाळी आसाममध्ये तेजपूरला देखील ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विटरवरून दिली.
गुजरातमधील द्वारकामध्ये गुरुवारी ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंप दुपारी ३.१५ वाजता झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आज सकाळी आसाममध्ये तेजपूरला देखील ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विटरवरून दिली.
ऑगस्ट महिन्यात गुजरातच्या जामनगरमध्ये 4.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. स्थानिक लोक स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसले होते. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे गंभीर नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.
Earthquake of Magnitude:5.0, Occurred on 04-11-2021, 15:15:38 IST, Lat: 24.15 & Long: 68.29, Depth: 10 Km ,Location: 223km NNW of Dwarka, Gujarat, India for more information download the BhooKamp App https://t.co/umwylhGOzW@ndmaindia@Indiametdeptpic.twitter.com/Lpi39krbuF
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 4, 2021